Tuesday, October 29, 2019

पसायदान

Sant Snyaneshwar Maharaj


महाराष्ट्रातील थोर संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी पसायदान लिहिले आहे. श्रीमद भगवत गीतेचे मराठी प्राकृत भाषेतील विवेचन म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या शेवटी संत ज्ञानेश्वरांनी ईशवराकडे  पसायदान  मागितले आहे. पसायदान हे महाराष्ट्रातील घराघरांत ज्ञात असलेले काव्य आहे. अनेक कार्यक्रमांच्या शेवटी हे म्हटले जाते. म्हणताना योग्य चाळीत म्हटले तर हे अतिशय कर्णमधुर असे काव्य आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या काव्याला फार सुंदर संगीत दिले असून लता मंगेशकर यांनी हे अतिशय सुमधुर आवाजात गायिले आहे. युट्युबवर हे ऐकावयास मिळेल. 

कधी म्हणावे?

खरेतर कधीही.
सकाळी स्नानादिकानंतर अथवा संध्याकाळी दिवेलागणीच्या सुमारास म्हणल्यास उत्तम. या वेळांत म्हणले की मन प्रसन्न होते. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शेवटीसुद्धा म्हटले जाते. 

कोणी म्हणावे?

सर्वांनी.
बोलता यायला लागल्यापासून ऐकल्यास तीन तेचार वर्षाची लहान मुलसुद्धा आरामात म्हणू शकतात. काही शब्द मुलांना अवघड जाऊ शकतात पण सरावाने मुखोद्गत होते. 

लागणारा वेळ:

साधारण ०५-१० मिनिटे
*********************

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥