Sunday, September 4, 2011

मंदिरात गेल्यावर काय कराल?

-->
|| ॐ गं गणपतये नमः ||
मित्रांनो, मंदिरात ज्यांना जायला आवडते त्यांच्यासाठी हि थोडीशी माहिती. खरंतर जे नियमितपणे जातात त्यांना हे माहितीसुद्धा असेलच पण तरीसुद्धा काहीवेळेस काहींना हा प्रश्न पडतो. याच कारण काहीही असो आपल्याला काही त्याच्या खोलात जायचे नाही तर फक्त थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कारण प्रत्येक देवाच्या मंदिराची हि एक खासियत असते.
यामध्ये तुम्हाला काही बदल सुचवायचे असतील तर जरूर सांगा आपण ते नक्की करू. तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. धन्यवाद!

१. श्री गणपती मंदिर
काय कराल:
मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम घंटा वाजवा.
देवाला नमस्कार करा.
देवासाठी हार-फुले, नैवेद्य इत्यादी काही आणले असल्यास ते अर्पण करा.
साधारणपणे ३ प्रदक्षिणा (डावीकडून उजवीकडे) गणपती मूर्तीभोवती / गाभाऱ्याभोवती पूर्ण करा.
तुम्ही ८, ११, २१, ५१, १०१, १०८, अशा कितीही प्रदक्षिणा पूर्ण करू शकता.

जप:
|| ॐ गं गणपतये नमः || या मंत्राचा जप करा. इतरही अनेक मंत्र आहेत परंतु हा सगळ्यात सोपा मंत्र असल्याने येथे नमूद केला आहे. तुम्ही तुम्हाला हवा त्या मंत्राचा जप करू शकता.
ॐकाराचा जप सुद्धा करू शकता.

स्तोत्र:
जमल्यास अथर्वशीर्ष म्हणा. (कृपया इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या) अथर्वशीर्ष म्हणताना पद्मासन घालून बसावे.
तीर्थ / प्रसादाचा लाभ (उपलब्ध असल्यास) घेऊनच बाहेर पडा.

लागणारा वेळ:
साधारण ५ मिनिटे (अथर्वशीर्ष वगळून)
अथर्वशीर्ष म्हणून सुद्धा तुम्ही हे सर्व करून साधारण २० मिनिटात तुमच्या पुढील कार्यासाठी जाऊ शकता.

काय अर्पण करू शकता?
लाल रंगाची फुले: जास्वंदी, लाल गुलाब, कमळ, इत्यादी...
पांढऱ्या / हिरव्या दुर्वा, केवडा, इत्यादी...
उकडीचे मोदक, नारळ, इत्यादी...

२. श्री मोहिनीराज मंदिर
काय कराल:
मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम घंटा वाजवा.
कासवाची प्रतिकृती मंदिराच्या गाभाऱ्यासमोर मध्यभागी दिसेल तिला नमस्कार करा.
देवाला नमस्कार करा.
देवासाठी हार-फुले, नैवेद्य इत्यादी काही आणले असल्यास ते अर्पण करा.

जप:
|| ॐ मोहिनीराजाय नमः || या मंत्राचा जप करा. इतरही अनेक मंत्र आहेत परंतु हा सगळ्यात सोपा मंत्र असल्याने येथे नमूद केला आहे. तुम्ही तुम्हाला हवा त्या मंत्राचा जप करू शकता.
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः || मंत्राचा किंवा ॐकाराचा जप सुद्धा करू शकता.

स्तोत्र:
जमल्यास श्री मोहिनीराज स्तोत्र म्हणा. (कृपया इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या) स्तोत्र म्हणताना पद्मासन घालून बसावे.
तीर्थ / प्रसादाचा लाभ (उपलब्ध असल्यास) घेऊनच बाहेर पडा.

लागणारा वेळ:
साधारण ५ मिनिटे (स्तोत्र वगळून)
स्तोत्र म्हणून सुद्धा तुम्ही हे सर्व करून साधारण २० ते २५ मिनिटात तुमच्या पुढील कार्यासाठी जाऊ शकता.

काय अर्पण करू शकता?
पिवळ्या रंगाची फुले: शेवंती, पिवळा गुलाब, चाफा, कमळ, इत्यादी...
तुळस, इत्यादी...
खव्याचे पदार्थ, लोणी-साखर, नारळ, इत्यादी...

३. श्री महादेव मंदिर
काय कराल:
मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम तुम्हाला महानंदी दिसेल. त्याला नमस्कार करा.
नंतर घंटा वाजवा.
देवाला नमस्कार करा.
देवासाठी हार-फुले, नैवेद्य इत्यादी काही आणले असल्यास ते अर्पण करा.
साधारणपणे ३ अर्ध-प्रदक्षिणा (डावीकडून उजवीकडे) शिव लिंगाभोवती / गाभाऱ्याभोवती पूर्ण करा.
तुम्ही जर “स्वयंभू” शिवलिंग असलेल्या मंदिरात गेला असाल तर पूर्ण प्रदक्षिणा करावी.
तुम्ही ८, ११, २१, ५१, १०१, १०८, अशा कितीही प्रदक्षिणा पूर्ण करू शकता.

नोंद: भारतातील बारा ज्योतिर्लिंगे हि स्वयंभू प्रकारची आहेत. तेथे पूर्ण प्रदक्षिणा करावी.

जप:
|| ॐ नमः शिवाय || या मंत्राचा जप करा. इतरही अनेक मंत्र आहेत परंतु हा सगळ्यात सोपा मंत्र असल्याने येथे नमूद केला आहे. तुम्ही तुम्हाला हवा त्या मंत्राचा जप करू शकता.
ॐकाराचा / महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा करू शकता.

स्तोत्र:
जमल्यास शिवस्तुती / शिवस्तोत्र म्हणा. (कृपया इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या) स्तोत्र म्हणताना पद्मासन घालून बसावे.
ध्यान करावे.
तीर्थ / प्रसादाचा लाभ (उपलब्ध असल्यास) घेऊनच बाहेर पडा.

लागणारा वेळ:
साधारण ५ मिनिटे (स्तोत्र वगळून)
अथर्वशीर्ष म्हणून सुद्धा तुम्ही हे सर्व करून साधारण २० ते २५ मिनिटात तुमच्या पुढील कार्यासाठी जाऊ शकता.

काय अर्पण करू शकता?
पांढऱ्या रंगाची फुले: धोत्रा, जाई, जुई, चाफा, इत्यादी...
बेलाची पाने, निरगुडीची पाने, इत्यादी...
दही भात, नारळ (फोडू नये), इत्यादी...

४. श्री महाविष्णू मंदिर
काय कराल:
मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम घंटा वाजवा.
कासवाची प्रतिकृती मंदिराच्या गाभाऱ्यासमोर मध्यभागी दिसेल तिला नमस्कार करा.
देवाला नमस्कार करा.
देवासाठी हार-फुले, नैवेद्य इत्यादी काही आणले असल्यास ते अर्पण करा.
साधारणपणे ३ प्रदक्षिणा (डावीकडून उजवीकडे) गणपती मूर्तीभोवती / गाभाऱ्याभोवती पूर्ण करा.
तुम्ही ८, ११, २१, ५१, १०१, १०८, अशा कितीही प्रदक्षिणा पूर्ण करू शकता.

जप:
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ||  या मंत्राचा जप करा. इतरही अनेक मंत्र आहेत परंतु हा सगळ्यात सोपा मंत्र असल्याने येथे नमूद केला आहे. तुम्ही तुम्हाला हवा त्या मंत्राचा जप करू शकता.
ॐकाराचा जप सुद्धा करू शकता.

स्तोत्र:
जमल्यास व्यंकटेश स्तोत्र म्हणा. (कृपया इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या) व्यंकटेश स्तोत्र म्हणताना पद्मासन घालून बसावे.
तीर्थ / प्रसादाचा लाभ (उपलब्ध असल्यास) घेऊनच बाहेर पडा.

लागणारा वेळ:
साधारण ५ मिनिटे (व्यंकटेश स्तोत्र वगळून)
व्यंकटेश स्तोत्र म्हणून सुद्धा तुम्ही हे सर्व करून साधारण २० ते २५ मिनिटात तुमच्या पुढील कार्यासाठी जाऊ शकता.

काय अर्पण करू शकता?
पिवळ्या रंगाची फुले: शेवंती, पिवळा गुलाब, चाफा, कमळ, इत्यादी...
तुळस, इत्यादी...
खव्याचे पदार्थ, लोणी-साखर, नारळ, इत्यादी...

1 comment: